बोरगांव येथील श्री जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघाची वार्षिक सभा खेळीमेळी संपन्न
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
सहकार क्षेत्रात अल्पावधीत यश संपादन केलेली बोरगाव येथील श्री जिनलक्ष्मी सौहार्द संस्थेला अहवाल सालात 02 लाख 79 हजारावर नफा झाला असल्याचे मत प्रतिपादन चेअरमन अजित पाटील यांनी केले.तर लवकरच संस्थेच्या नव्या दोन शाखेचे विस्तारीकरण करणार असल्याचेही सांगितले.
ते बोरगाव येथील राजकिचन हॉलमध्ये श्री जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते ,कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरगाव शिक्षण संघाचे निवृत्त मुख्याध्यापक टी डी सावाडे हे होते.
कार्यक्रमाचे स्वागत सहशिक्षक बशीर मुजावर यांनी केले. श्री लक्ष्मी देवतेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संघाचे चेअरमन श्री अजित पाटील म्हणाले की आमच्या जनप्रिय जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघाची अहवाल सालात एकूण 542 इतकी सभासद संख्या आहे, सभासदांच्या विश्वासात पात्र राहून एकंदर 7,26,500. इतकी भागवंडवल केले असून अहवाल चालत 8 कोटी 15 लाख 20,हजार 558 इतक्या ठेवी जमा करून सभासदांच्या विश्वासाला पात्र झाले आहेत. गावातील वाहनधारक, शेतकरी ,सभासद व व्यापारी वर्गांना एकाच छायेखाली रोजगार व त्यांचे जीवन समृद्ध व्हावे याकरिता संस्थेने अहवाल सालात 4 कोटी 80 लाख 96 हजार 287 इतकी कर्ज वितरण करून सभासदांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेची काटकसर व कर्जांनी वेळेत केलेली परत फेड यावर अहवाल सालात संघाने 2 लाख 79 हजार 153 इतकं तो निव्वळ नफा मिळवला असल्याचे मत चेअरमन श्री अजित पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमात नफा तोटा, अंदाज पत्रकाचे वाचन संघाचे व्यवस्थापक ओमकार मैसाळ यांनी करून उपस्थित सभासदा कडून अनेक ठरावांना मंजुरी मिळवली. यावेळी श्री जिनलक्ष्मी सौहार्द संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर मिरजे म्हणाले की जिन लक्ष्मी संस्थेने काटकसर व पारदर्शक कारभार करून सभासद व ठेवी ,कर्जदरांचा विश्वास संपादन केला आहे. संचालक व तत्पर कर्मचारी यांच्यामुळे अल्पावधीत संस्थेने दोन लाख 79 हजार इतका ढोबळ नफा संपादन केला असल्यामुळे येणाऱ्या काळात संस्थेकडून दोन शाखा काढण्याचा उद्दिष्ट ठेवला आहे, लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे सागर मीरजे यांनी सांगितले. संघ ऊर्जेतांवस्थेला येण्यासाठी संचालक, कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे असते असेही श्री सागर मिरजे यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक टी .डी सावाडे यांनी जनलक्ष्मी संघाच्या प्रगती विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी जीनलक्ष्मी सौहार्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर मिरजे, चेअरमन अजित पाटील,संचालक निलेश पाटील, सुधीर तेरदाळे, भरतेश लगारे ,प्रकाश फिरगणावर ,प्रवीण हावले, पोपट चौगुले, रंजीत ऐतवडे, श्रीमंत पाटील, आनंद मोकाशी, अमर सातपुते, राजू नरवाडे,बशीर मुजावर,सावडे सर, इंडी सर, शांतगोंडा पाटील, सल्लागार मंडळी तर बँकेच्या मुख्य व्यवस्थापक ओमकार मैसाले, क्लार्क अरिहंत पाटील, अभिनंदन पाटील यांच्यासह सभासद, कर्जदार, ठेवीदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा