बोरगाव येथे सिद्धेश्वर सोसायटीच्या नूतन वास्तूचे थाटात उद्घाटन

 अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव तालुका निपाणी येथील श्री सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटीच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा व रोप्य महोत्सवी कार्यक्रम जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 याप्रसंगी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले गेल्या २५ वर्षांपूर्वी बोरगाव सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या सिद्धेश्वर सोसायटीने सहकाराला सामाजिकतेची जोड देऊन अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, क्रीडापटूंना सहकार्य याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हित जोपासले आहे.आज या संस्थेची भव्य दिव्य इमारत उभारली असून सहकाराला सामाजिकतेची जोड देणारी ही एक आदर्श संस्था असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

  प्रारंभी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर माझी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तर आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू वितरण करण्यात आले.

  स्वागत व प्रास्ताविकात संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हवले म्हणाले सर्व सभासदांच्या सहकार्याने पाच कोटी रुपये खर्च करून ही सिद्धेश्वर ची भव्य दिव्य इमारत उभारली असून यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.

  माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले सहकार क्षेत्रात सिद्धेश्वर सोसायटीचे कार्य मोलाचे असून ग्रामीण भागात अण्णासाहेब हवले यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वरची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे सांगितले.

  माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले सिद्धेश्वर सोसायटीचा सहकारातील आदर्श घेण्यासारखा आहे. येणाऱ्या काळातही सिद्धेश्वर कडून असेच सामाजिक उपक्रम होत राहो असे शुभेच्छा दिल्या.

   तर अध्यक्षानावरून बोलताना प्रकाश हुक्केरी म्हणाले सिद्धेश्वर सोसायटीने रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले असून येणाऱ्या काळातही संस्थेची अशीच प्रगती होत राहो यासाठी लागेल ते सहकार्य करण्यास आपण यापुढेही कटिबद्ध आहोत असे सांगितले.

  या कार्यक्रमास 

विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी,सहकार महर्षी डी. टी. पाटील, दत्तचे संचालक गणपतराव पाटील, पंचगंगा शुगरचे अध्यक्ष पी.एम. पाटील, डॉ. संजय होसमठ,डॉ. एन. ए. मगदूम,एडवोकेट एस.टी. मुन्नोळे, बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, राजेश कदम,, राजेंद्र पवार, सिद्धेश्वर सोसायटीचे उपाध्यक्ष सुकुमार चिपरे,संचालक सुरेंद्र पाटील, आण्णासाहेब मालगावे, विद्याधर आम्मण्णावर,स्मिता माळी,पद्मश्री बंकापुरे, रामचंद्र फिरगण्णावर,बाबासाहेब बंकापुरे, शिवाप्पा माळगे, बाळाराम खोत,सुभाष गोरवाडे, विजय शिंगे,रशीद मोमीन,प्रधान व्यवस्थापक संजय हवले,सौ सुनीता हवले , युवा नेते अनुज हवले,राहुल हवले, सिध्दार्थ हवले,दत्त संचालक अरुण देसाई, त्रिवेणी मॅडम यांच्यासह सिद्धेश्वरच्या सर्व शाखेचे संचालक, सभासद, हितचिंतक, ठेवीदार व कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन राजू खिचडे यांनी तर आभार सुरेंद्र पाटील यांनी मानले.  

                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष