कवठेगुलंदच्या समरजीत योगेश जगतापचे सुयश

अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

इचलकरंजी टँलेट सर्च परिक्षेत कवठेगुलंदचा समरजीत योगेश जगतापने प्रथम क्रमांक पटकावला. 

     समरजीत जगताप हा बुबनाळ (ता.शिरोळ)येथील कुमार विद्या मंदिर प्रशालेचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे. समरजीतने ३०० पैकी २९४ गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला.तसेच याच प्रशालेचे ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. ही परिक्षा खाजगी प्राथमिक शिक्षक समिती इचलकरंजीमार्फत प्रत्येक वर्षी घेतली जाते.कार्यक्रमाचे बक्षिस वितरण खासदार धैर्यशील माने व इचलकरंजीचे अशोक स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा शहापुरे,वर्गशिक्षक विलास चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष