अपात्र कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी : अनिलराव यादव यांची पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे मागणी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात देवस्थान जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून तात्काळ कर्जपुरवठा करावा तसेच अपात्र 44 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शिरोळ तालुक्याचे नेते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन केली.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात सोमवारी अनिलराव यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील देवस्थान जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांचा थांबवलेला कर्जपुरवठा चालू करणे गरजेचे आहे सदरचे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे महापुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे गरजेचे आहे या कामी आपण जातीने लक्ष घालून तात्काळ कर्ज पुरवठा सुरू करावा तसेच शेतकऱ्यांना महापुरातील नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 112 कोटी अपात्र कर्जमाफी व्याजासह नाबार्डने बेकायदेशीररित्या वसुल केली आहे याचा जिल्ह्यातील 44 हजार शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला अपात्र झालेली कर्जमाफी मिळून सदरची रक्कम शेतकऱ्यांना परत मिळावी या विषयी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत अशी मागणी तालुक्याचे जेष्ठ नेते अनिलराव यादव यांनी केली.
यावेळी शिरोळ तालुक्यातील राजू रावण,अखलाक पटेल,अश्रफ पटेल, जयपाल कुंभोजे, इस्तियाक पटेल, बाळासाहेब गडगले यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा