हेरवाड गावचे सुपुत्र अजितकुमार पाटील “अमेझिंग इंडियन पर्सनॅलिटी पुरस्काराने सन्मानित

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये ‘अमेझिंग भारत’ या संस्थेकडून आयोजित कार्यक्रमात माईंड ट्रेनर अजितकुमार पाटील यांना “अमेझिंग इंडियन पर्सनॅलिटी” या सन्मानाने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्यानंतर माईंड ट्रेनर अजितकुमार पाटील यांनी म्हणाले, “हा सन्मान मिळाल्याचा मला अत्यंत आनंद आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले. मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे सांगितले.

‘अमेझिंग भारत’ ही संस्था गेल्या नऊ वर्षांपासून आपल्या कार्यामुळे प्रेरणादायी असलेल्या व्यक्तींना सन्मानित करत आहे. या वर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुंबई पोलिस महासंचालक, ‘द कपिल शर्मा शो’ चे प्रोड्युसर, बॉलिवूडमधील मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष