श्री दत्त कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
ठरल्याप्रमाणे प्रतिटन शंभर रुपये अधिक देण्यास आम्ही तयार असून शासनाने परवानगी द्यावी त्यासाठी आम्हीही खास प्रयत्न करीत असून शासनाने परवानगी दिल्याबरोबर ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा करणार असल्याची माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी दिली.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपस्थित बहुसंख्य सभासदांनी सर्वच विषय हात उंचावून मंजूर केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील हे होते. यावेळी सभासदांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाचे उत्तर कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी दिली. त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. सुमारे एक तास ही वार्षिक साधारण सभा सुरू होती. यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले की चालू वर्षी 15 ते 16 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चालू गळीत हंगामात एफ आर पी ची एक रकमी रक्कम देण्यात येणार आहे. काही लोकांनी कारखान्यावर ८३८ कोटीचे कर्ज असल्याचा आरोप केला आहे. तो त्यांनी फेटाळून लावला.
कारखान्याच्या आर्थिक स्थिती भक्कम असून कारखान्याच्या विस्तारीकरण करण्याकरिता घेतलेले 130 कोटी 96 लाख रुपये, तसेच डिसटीलरी व इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरण करिता 83 कोटी 80 लाख असे एकूण 214 कोटी 76 लाख रुपये कर्जाची रक्कम घेतली आहे. त्यापैकी आज रोजी 210 कोटी 60 लाख रुपये इतके कर्ज व कोविड काळात रिझर्व बँक रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या धोरणानुसार बँक ऑफ इंडिया कडून घेतलेले 41 कोटी 68 लाख असे एकूण 251 कोटी 98 लाख इतके कर्ज असताना नाहक बदनामी करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी आपल्याला पुन्हा विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नसल्याचे गणपतराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी उपस्थितताचे स्वागत कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केले. यावेळी दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि चारिटेबल ट्रस्टची 17 वी वार्षिक साधारण सभा संपन्न झाली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूर केले.
या सभेस उत्तम पाटील बोरगावकर ,पृथ्वीराज सिंह यादव, व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक, संचालक अनिलराव यादव, इंद्रजीत पाटील, एडवोकेट प्रमोद पाटील, श्रीमती विनया घोरपडे, सौ अस्मिता पाटील, सौ संगीता पाटील कोथळीकर, मंजूर मेस्त्री, संजय पाटील, रघुनाथ माने, विजय सूर्यवंशी, अरुण देसाई, महेंद्र बागी, अनंत धनवडे, धनाजी पाटील नरदेकर, पंडित काळे, यांच्यासह सर्व संचालक सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना, यांच्यासह सर्व अधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयसिंगपूर विभागाच्या पोलीस अधिकारी डॉ रोहिणी सोळंके शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा