VFX च्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना हॉलीवुड आणि बॉलीवूडच्या चित्रपटात काम करण्याची संधी
भागातील विद्यार्थ्यांसाठी VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) क्षेत्रात करिअरची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. चित्रपट, जाहिराती, गेमिंग, आणि अॅनिमेशनमध्ये VFX चा वापर वाढत आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील तज्ञांची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी VFX क्षेत्रात करिअर करु शकतात आणि शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चित्रपट सृष्टीत काम करण्याची संधी मिळावी या हेतूने हेरवाड तालुका शिरोळ येथील मोहसिन जमादार यांनी कुरुंदवाड एस. के. पाटील कॉलेज रोड लगत शुगरकेन मीडिया वर्क्सची स्थापना केली आहे. याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हॉलीवुड आणि बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये व्हीएफएक्स च्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जमादार यांनी विद्यार्थ्यांना कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन पुणे मुंबई आणि विविध देशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चित्रपट सृष्टीत जाण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने अनेक विद्यार्थी यामध्ये करिअर करू शकतात.
मोहसीन जमादार यांनी प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांनी टायटॅनिक, जुरासिक पार्क, तान्हाजी, कलकी, आरआरआर आदी नावाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.
VFX शिकण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स, व्हिडिओ ट्युटोरियल्स आणि प्रमाणित कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन विद्यार्थी आपले कौशल्य वाढवू शकतात. भारतातील अनेक संस्थांमध्ये VFX चे विशेष कोर्सेस देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मुलभूत तांत्रिक ज्ञान, सॉफ्टवेअर वापर, आणि क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन दिले जाते. VFX क्षेत्रात प्रगती करण्यासाठी कल्पकता, तांत्रिक ज्ञान आणि चिकाटी आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घेतल्यास, ते मोठ्या यशाचे शिखर गाठू शकतात.
शुगरकेन मीडिया वर्क्स, कुरुंदवाडमधील एक आघाडीची VFX इन्स्टिट्यूट आणि स्टुडिओ, जिथे आपण VFX च्या जगात यशस्वी करिअरची सुरुवात करू शकता. हा स्टुडिओ जगभरातील अनेक सुपरहिट चित्रपटांवर काम करत आहे, टायटॅनिक मधील सुंदर दृश्यं असोत किंवा ज्युरासिक पार्क मधील जिवंत वाटणारे डायनासोर, नेहमीच उत्कृष्टता आणि नवनिर्मितीवर भर दिला आहे. बॉलिवूडमध्येही शुगरकेन मीडियाचा ठसा स्पष्ट आहे. या संस्थेच्या अनुभवी कलाकारांच्या टीमने अनेक अत्याधुनिक दृश्य प्रभावांची निर्मिती केली आहे. या चित्रपटांनी केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक प्रेक्षकांनाही प्रभावित केले आहे. त्यामुळेच, हे इन्स्टिट्यूट आणि स्टुडिओ हे VFX शिकण्यासाठी आणि काम करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
आमची VFX इन्स्टिट्यूट फक्त एक शिक्षणकेंद्र नाही, तर आपल्या VFX करिअरला एक वेगळी दिशा देणारे व्यासपीठ आहे.
या इन्स्टिट्यूटमध्ये, तुम्हाला तेच मार्गदर्शक शिकवतील ज्यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या आघाडीच्या चित्रपटांवर काम केले आहे. प्रशिक्षक आपल्याला तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, आणि VFX च्या ताज्या ट्रेंड्समध्ये प्रगत प्रशिक्षण देतात. खऱ्या जगातील अनुभव
सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रॅक्टिकल अनुभव महत्त्वाचा आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष चित्रपट आणि प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. यामुळे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये आवश्यक असलेल्या आव्हानांचा आणि त्याच्या सोडवणुकीचा खरा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
आमची इन्स्टिट्यूट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. Autodesk Maya, Nuke, Houdini सारख्या सॉफ्टवेअरवर तुम्ही काम कराल, ज्यामुळे तुम्हाला जागतिक दर्जाच्या VFX तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळेल.
100% नोकरी हमी आणि प्लेसमेंट समर्थन हे या इन्स्टिट्यूटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भारतातील प्रमुख मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये (MNCs) आमच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यात आले आहे. या संस्थेचे मजबूत उद्योगसंबंध तुम्हाला VFX च्या व्यावसायिक जगात सहज प्रवेश मिळवून देतील.
तुम्ही 3D मॉडेलिंग, कॅरेक्टर अॅनिमेशन किंवा VFX सुपरविजनमध्ये आवड असो, सदरचे इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना एक नवा आयाम देईल. VFX इंडस्ट्री सध्या वेगाने वाढत आहे आणि या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन गरजेचं आहे. तुमच्या VFX करिअरला आजच सुरुवात करण्यासाठी या इन्स्टिट्यूटमध्ये घेतल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होणार आहे.
शुगरकेन मिडिया वर्क्सचे योगदान
संस्थापक मोहसिन जमादार यांनी शुगरकेन मिडिया कर्क्सच्या माध्यमातून बॉलीवूड मधीन थग्स ऑफ हिंदुस्थान, वार्स, झिरो, मैदान, कलकी, पुष्पा, तानाजी, फाईटर, रावण यासह हॉलिवूड मधील, अव्हेंजर्स, स्पाईडर मॅन, स्टार, वार्स, द बोयस, व्हिल्स ऑफ टाइम, पिनोकिऊ' आयर्न मॅन, एवरेस्ट आर यासह दीडशेहून अधिक चित्रपटामध्ये व्हिएफएक्सच्या माध्यमातून काम केले आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा