चिंचवाड येथे आज श्रवणबेळगोळचे भट्टारक महास्वामीजी यांचा मंगल प्रवेश

 


उदगाव / शिवार न्यूज नेटवर्क :

    चिंचवाड (ता. शिरोळ) येथे कर्नाटक येथील श्रवणबेळगोळचे स्वस्तिश्री अभिनव चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी यांचा मंगल प्रवेश होणार आहे. शुक्रवारी (दि. १८ ) सकाळी दहा वाजता त्यांचे चिंचवाड गावात आगमन होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

कर्नाटक येथील श्रवणबेळगोळ हे जैन समाजाचे मोठे तीर्थस्थान आहे. श्री 1008 बाहुबली भगवानांची 57 फूट उंचीची मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. या ठिकाणी स्वस्तीश्री अभिनव चारूकीर्ती महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली मठाद्वारे येथील काम चालते. या मठाचे अधिपती स्वस्तिश्री अभिनव चारूकीर्ती भट्टारक महास्वामीजी हे शुक्रवारी चिंचवाड येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. तरी सर्व श्रावक - श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष