महाविकास आघाडीतून गणपतराव पाटील उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्याचे ठरवले आहे. छत्रपती शिवाजी चौकातून शिरोळ शहरात शक्ती प्रदर्शन करत, मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात गणपतराव पाटील अर्ज दाखल करणार आहेत.
गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांनी शिरोळ तालुक्यातील मतदार आणि समर्थकांसमवेत संवाद साधत गाठीभेटीवर जोर दिला आहे. या शक्ती प्रदर्शनात तालुक्यातील प्रमुख नेते आणि पाटील यांच्या समर्थकांची उपस्थिती राहणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा