नगरपरिषदेतर्फे शहरात मतदान जनजागृती मोहिम

 शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांचे पालन करीत शिरोळ नगरपरिषदेतर्फे शहरात मतदान जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, नागरिक, नगपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत जागृती फेरी, सायकल रॅली , दिवे प्रज्वलन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

         निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार (SVEEP) गतवेळच्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या शहर व प्रभागामध्ये मतदान जनजागृती करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या . त्या अनुषंगाने पोस्टर्स प्रदर्शन, शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून मतदानास आवाहन करण्यात आले.

        येथील श्री पद्माराजे हायस्कुल व जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून शहरातील नवमतदारांमध्ये मतदानाबाबत आवाहन करण्यात आले. बाजारपेठेमध्ये विक्रेते, नागरिक यांचेमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. 

     दिपावली सणाचे औचित्य साधुन येथील छत्रपती शिवाजी महाराज तक्त व परिसरात दिवे प्रज्वलीत करून व रांगोळीच्या सजावटीमधून “ माझी लोकशाही, माझे मत ” असा संदेश लिहुन मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. या नाविण्यपुर्ण उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या मागदर्शनाखाली लक्ष्मण लोंढे, प्रशासकीय अधिकारी, श्रीधर डुबुले, नगर अभियंता, अश्विनी पाटील, अविनाश नाईक, चंद्रकांत पाटील, संदिप चुडमुंगे, अमोल बन्ने, मल्लीकार्जून बल्लारी यांच्यासह कर्मचारी यांनी हा उपक्रम राबविला .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष