विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाकडून २३५६ आरोपींवर होणार प्रतिबंधक कारवाई
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
विधानसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत, निर्भीड वातावरणात आणि कोणत्याही दबावाशिवाय पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. याअंतर्गत, यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांतील तसेच शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील एकूण २३५६ आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस दलाकडून प्रसिद्धी पत्रकार देण्यात आली आहे.
या कारवाईत २२१७ आरोपींवर BNSS कलम १२६ नुसार कारवाई होणार आहे, तर ७१ आरोपींवर BNSS कलम १२९ प्रमाणे, १७ आरोपींवर BNSS कलम १६३ (२) नुसार, ३ आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत, १० आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ नुसार, एका आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५७ नुसार आणि ३७ आरोपींवर मुंबई दारुबंदी कायदा कलम ९३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
कोल्हापूर पोलीस दलाने या कारवाईत आरोपींवर कठोर पावले उचलण्याचे निश्चित केले असून, निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा