शिरोळचे डॉ दगडू माने यांचा ' प्रहार ' संघटनेला रामराम
डॉ. दगडू माने यांनी दिला प्रहार संघटनेचा राजीनामा
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू श्रीपती माने ( शिरोळ ) यांनी कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला आहे. आमदार बच्चुभाऊ कडू व स्वीय सहाय्यक गौरवभाऊ जाधव यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र मेलद्वारे पाठवले आहे.
माने यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ३२ वर्षे कार्यरत आहे. प्रहार चे संस्थापक - अध्यक्ष व आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या कार्यावर प्रभावित होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष काम करीत आहे. प्रहार पदाधिकारी यांची चांगली साथ मिळाल्याने गोरगरिब, निराधार , कष्टकरी व दिव्यांग यांच्यासाठी लढा देऊन प्रामाणिकपणे सामाजिक कार्य केले . आमदार बच्चुभाऊ यांच्यामुळे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला बळ मिळाले .
काही कारणास्तव आणि घरच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे प्रहार संघटनेच्या कामासाठी वेळ देता येत नाही. प्रहार नेतृत्वाचा आदर करून प्रहार जनशक्ती पक्षाचे सभासदत्व व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ दगडू माने यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा