आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे पालन करा : निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे पालनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. प्रारंभी राजकीय पक्षांचे अध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जावी, आचारसंहितेच्या नियमांमध्ये कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी शासकीय साधनसंपत्तीचा वापर होऊ नये, जनतेसाठी असलेल्या योजनांची घोषणा टाळावी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे किंवा दबाव आणणे टाळावे, यासारख्या बाबींचा समावेश आहे. या नियमांचे पालन न केल्यास निवडणूक आयोगाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला.
यानंतर शासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीचे नियोजन सांगण्यात आले. तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार यांच्या झालेल्या बैठकीत निवडणूक काळात कोणत्याही उमेदवाराची बातमी अथवा जाहिरात करताना जिल्हातील निवडणूक मीडिया कमिटीकडून कशाप्रकारे बातम्या जाहिरात प्रसिद्ध करावी याची माहिती घ्यावी खोटी,जातीय तेढ, अपप्रचार करणारी बातमी प्रसिद्ध होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी नष्टे यांनी केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप उबाळे, तहसिलदार अनिलकुमार हेळकर,पोलीस निरिक्षक शिवाजी गायकवाड,गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्यासह अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा