महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करू : विक्रमसिंह जगदाळे

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरोळ तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील व माजी कार्यसम्राट आमदार उल्हास पाटील, स्नेहा देसाई यांची नांवे चर्चेत असून दोघांपैकी कोणालाही तिकीट मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संपूर्ण ताकदीनिशी त्या उमेदवाराचा प्रचार करेल व त्यांना निवडून आणेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

आमचे नेते शरदचंद्र पवार यांनी दिलेल्या आदेशान्वये महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार जो उमेदवार शिरोळ तालुक्यात उभा राहील त्याच्या पाठीशी उभे राहून त्या उमेदवाराचा प्रचार युद्ध पातळीवर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले आहे. सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसून उद्यानपंडित गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील व स्नेहा देसाई यांची नांवे चर्चेत आहेत. यापैकी कोणालाही तिकीट मिळो, शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी जिवाचं रान करून प्रचार करेल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष