बोरगांव येथे भाजप नेते शरद जंगठे यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथील समस्त भाजप कार्यकर्ते च्या वतीने माजी खासदार अण्णासाहेब जोले यांच्या 62 व्या वाढदिनी सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी बोरगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती हालशुगर संचालक, श्री आचार्य 108 शांती सागर को आप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष,नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली. आज बोरगाव येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना जंगटे म्हणाले, गेल्या चार दशकापासून अण्णासाहेब जोल्ले यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांपर्यंत जाऊन तेथील अडीअडचणी समस्या सोडविले आहेत .यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा यासाठी आपण येथील सकल भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जोल्ले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या वाढदिनी आपण या ठिकाणी विविध उपक्रम हाती घेतले आहेत . यावेळी अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले,ज्योतीप्रसाद जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, हाल शुगर चेअरमन मलगोंडा पाटील ,निपाणीचे नगराध्यक्ष सोनल कोठडिया , पवन पाटील ,संतोष सांगावकर ,आप्पासाहेब जोल्ले ,जयकुमार खोत, रामगोंडा पाटील ,युनुस मुल्ला ,श्रीकांत बन्ने,भाजप नेते सुनील पाटील आदी उपस्थित असणार आहेत . सर्वांनी उपस्थित राहून रहावे असे आवाहन त्यांनी केले.
माजी नगरसेवक बाबासाहेब चौगुले यांनी , जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा 62 वा वाढदिनी 7 ऑक्टोबर रोजी, सकाळी 9 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप, 10 वाजता सरकारी प्राथमिक शाळेच्या मुला मुलींच्या नोटबुक वाटप, व नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना जीवनावश्याक वस्तू किटचे वाटप होणार आहे .11 वाजता भव्य श्वान धावणे स्पर्धा आयोजन केले आहेत .यासाठी 10 हजार,7 हजार,5 हजार, 3 हजार व 2001 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे सांगितले.
पत्रकार बैठकीस शिवाजी भोरे, दादासो भादुले, उत्तम कदम , देव माळी,मोहपती खोत, जितेंद्र पाटील, शिशु एदमाळे, अमित माळी, अजित कांबळे ,फिरोज अपराज, रमेश मालगावे, अजित तेरदाळे, बीपीन देसाई, यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद जंगटे साहेब एक नंबर माणूस 👍
उत्तर द्याहटवा