आजपासून शिरोळ तालुक्यात भरारी पथकाची टेहाळणी : रात्री १० नंतर हॉटेल, बार सुरू राहिल्यास होणार कारवाई
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे कठोर पालन करण्यासाठी १२ जणांच्या माध्यमातून ६ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी आजपासून तालुक्यात गस्त घालणे सुरू केले असून, रात्री १० नंतर हॉटेल्स, बार किंवा अन्य व्यवसाय सुरू राहिल्यास त्वरित कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून हे पथक सतर्क राहणार असून कोणत्याही बेकायदेशीर घडामोडींवर कठोर पावले उचलणार आहे.
शिरोळ तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करण्यासाठी या पथकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. एकूण सहा पथके तैनात करण्यात आली आहेत, ज्यापैकी तीन पथके दिवसभर कारवाईवर लक्ष ठेवतील, तर उर्वरित तीन पथके रात्रीच्या वेळी गस्त घालतील.
रात्री १० नंतर हॉटेल्स, बार आणि अन्य व्यवसाय सुरू ठेवणे आचारसंहितेचे उल्लंघन समजले जाणार आहे. त्यामुळे या पथकाने अशा ठिकाणांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पथकाच्या कामगिरीची नियमितपणे नोंद घेऊन वरिष्ठ अधिकार्यांना अहवाल सादर केला जाणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात हे पथक काम करणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा