हेरवाड येथे संतुबाई देवीच्या यात्रेच्या पूर्व तयारीला प्रारंभ

 देवीचा मानाचा भंडारा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामदैवत संतुबाई देवीच्या यात्रेला लवकरच प्रारंभ होणार आहे. आज भूमिपूजनाच्या निमित्ताने धनगर समाज बांधवांनी देवीचा मानाचा भंडारा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला. यामुळे यात्रेच्या पूर्व तयारीला आजपासून सुरुवात झाली आहे. 

ग्रामपंचायत, धनगर समाज आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा साजरी करण्यात येते. यात्रेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे विविध प्रकार, तसेच खेळणे आणि आकर्षक पाळणे उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, धनगर समाजाचे बंडू बरगाले, कऱ्याप्पा ईटाज, कृष्णा पुजारी, दगडू कोरुचे यांच्यासह धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष