कोथळीतून मोठे मताधिक्य देऊन आमदार यड्रावकर यांचे ऋण फेडणार : धनगोंडा पाटील

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा कोथळीतून प्रचार शुभारंभ 

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जात - पात, गट - तट न पाहता कोथळी गावासाठी तब्बल २१ कोटी ७० लाखाचा भरघोस निधी दिला असल्याने कोथळी गावचा कायापालट झाला आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी संपूर्ण कोथळी गाव मताच्या रुपातून आमदार यड्रावकर यांना पाठबळ देऊन पुन्हा विधानसभेत पाठवू, असा विश्वास ज्येष्ठ नेते पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील यांनी व्यक्त केला.

राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोथळीसह परिसरातील गावभेटी घेतल्या. यावेळी ते बोलत होते.  प्रारंभी कोथळी येथील जागृत देवस्थान मंगेश वर मंदिरात प्रचाराचा शुभारंभ पै. शंकर पुजारी, बाहुबली इसराण्णा, विजय खवाटे, आकाराम पुजारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.

यावेळी बोलताना महावीर पतसंस्थेचे संचालक बाहुबली इसराण्णा म्हणाले, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून कोथळी गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. पायाभूत सुविधांसह इतर सुविधा पुरवण्याकडे आमदार यड्रावकर यांनी भरघोस निधी दिला आहे, त्यामुळे उघडपणे आम्ही आमदार यड्रावकर यांचा प्रचार करून त्यांना गावातून मोठे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

माजी सरपंच विजय खवाटे म्हणाले, कोथळी गावच्या इतिहासात २१ कोटी ७० लाख रुपयांचा निधी पहिल्यांदाच मिळाला आहे. अगदी आचारसंहितेपर्यंत विकास कामांचे नारळ आमच्या गावात फोडण्यात आले. आणि गावचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून झाला असल्याने संपूर्ण कोथळीकर आमदार यड्रावकर यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बोलताना विनोद कांबळे म्हणाले, कोथळी येथील संपूर्ण बौद्ध समाज आमदार यड्रावकर यांच्या पाठीशी असून संपूर्ण समाजातून त्यांना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी स्वागत दिलीप मगदूम यांनी केले. प्रस्ताविकात संजय नांदणे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकासकामांचा आढावा मांडला. 

यावेळी दशरथ काळे, कोथळीचे सरपंच अनमोल करे, उपसरपंच शरद कांबळे, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य भरतेश खवाटे, बाबुराव पाटील, लक्ष्मी पतसंस्थेचे अजित पाटील गौंडाप्पा, क्रांतीसमूहाचे नेते देवगोंडा पाटील, राजेंद्र नांदणे, जवाहरचे संचालक गौतम इंगळे, बच्चन धनगर, ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे, हिदायत नदाफ, तंटामुक्त अध्यक्ष सनी मगदूम, माजी ग्रामपंचायत सदस्य रवी पुजारी, रावसो बोरगावे, महावीर बोरगावे, सागर पुजारी, अमोल पाटील धडेल, सचिन कांबळे, प्रकाश बोरगावे, नामदेव कांबळे, जीवन तिवडे, संतोष तिवडे, रावसाहेब विभुते, जितेंद्र माळी, बबन माळी, गणेश जंगम, अण्णा आंबी, प्रमोद कुंभार, दिलीप कुंभार, भाऊसो मगदूम, प्रकाश पुजारी, उत्तम तिवडे, यश तिवडे, मधुकर तिवडे, संदीप मोरे, अमोल हंकारे, देवल हंकारे, भास्कर फरास सुधीर आवळे यांच्यासह क्रांती समूहातील सर्व पदाधिकारी, गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष