वि.मं.खणदाळ शाळेची सलग दुसऱ्या वर्षी विभागीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :
नवे पारगाव येथे झालेल्या 14 वर्षांखालील शासकीय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत वि.मं.खणदाळ शाळेने प्रथम क्रमांक मिळवून सलग दुसऱ्या वर्षी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने खेळाडूंची मिरवणूक काढण्यात आली आणि जंगी स्वागत करण्यात आले.
संघाचा पहिला उपांत्य सामना शाहूवाडीच्या संघासोबत झाला. वि.मं.खणदाळ शाळेने 4-2 च्या फरकाने हा सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात राजर्षी शाहू विद्यानिकेतन, शिंगणापूरच्या संघासोबत चुरशीचा सामना झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि सामना दोन वेळा ट्रायबेकरवर 2-2 असा बरोबरीत गेला. अखेरीस, सडनडेथवर वि.मं.खणदाळ शाळेने विजय मिळवला आणि विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. खेळात सहभागी झालेले खेळाडू पूर्वा चिरमुरे ,विद्याश्री धनवडे ,सेजल घोडके ,श्रावणी जाधव ,सावित्री मोरे ,श्रृती पाटील ,स्नेहा पाटील ,प्रगती कोणूरी ,प्राजक्ता दळवाई ,प्रतिक्षा मगदूम ,मनुजा घोडके या यशस्वी कामगिरीसाठी प्रशिक्षक रवि यरकदावर, अमित चव्हाण, मारूती कोलूनकर आणि संघ व्यवस्थापक सौ. राजश्री मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्रीकांत पोवार, केंद्र प्रमुख सुरेश हुली, तसेच गटशिक्षणाधिकारी हालबागोळ साहेबांनी खेळाडूंचे कौतुक केले. मिरवणुकीमध्ये संतोष यरकदावर, युवराज भोसले, पार्वती फडतरे, रेखा नाईक, सुधा हुली, वत्सला पाटील आणि खणदाळ गावातील अनेक ग्रामस्थ व पालक विद्यार्थी सहभागी झाले होते. मल्लीकार्जुन यादगुडी यांनी आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा