बोरगांव येथील श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून विक्रमी बोनस वाटप
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. बोरगांव येथील दूध संघाच्या वतीने सभागृहात सभासदांना वितरण करण्यात आले.
पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले की संघाकडून यावर्षी म्हैस विभागातून २ लाख, ३३ हजार, ६१५५ लिटर दूध तर, गाय विभागातून ८० हजार, ६०३ लिटर दूध उत्पादकांनी दूध पुरवठा करत एकूण सालात ३ लाख १४ हजार २१८ लिटर दूध संकलन करण्यात आले आहे. तसेच दूध उत्पादका बरोबरच ग्राहकांनाही संघाकडून भेटवस्तू देण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी दूध उत्पादकांना आपण उच्चकी बोनस देत असतो. यावर्षी म्हैस दूध उत्पादकांना ४ टक्के व गाय दूध उत्पादकांना ३ टक्के बिना कपात बोनस दिले आहे. एकूण सभासदांना सुमारे ५ लाख ६२ हजार ३०१ रुपये विक्रमी बोनस यावर्षी वितरण केले आहे. वासू संगोपन योजनेखाली मोफत वैद्यकीय सेवा, योग्य फॅटला योग्य दर बिनव्याजी ऍडव्हान्स, असे विविध योजना आपण संघाच्या वतीने देत असल्याचे सांगितले.
संघास सर्वाधिक दूध पुरवठा केलेल्या मध्ये म्हैस विभागात सुनिता पुणेकर, कल्लाप्पा कुरुंदवाडे, बाळासाहेब सुतार, यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले.. तर गाय विभागात भरत अम्मान्नवर, उमेश हेगळे, सचिन पाटील, यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. त्यांना बोनस देऊन यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकं दर अफराज, संचालक, मायगोंड पाटील, शितल हवले, रमेश माळी, रावसाहेब पाटील, भारती सावळवाडे, वैशाली, बुलबुले, हिराचंद चव्हाण, जयपाल कोरवी, बाळसहेब मडिवाळ, नगरसेवक दिगंबर कांबळे, पि.के.पी.एस. संघाचे आर. टी. चौगुले, व्यवस्थापक बाहुबली कवटे यांच्यासह दूध उत्पादक ग्राहक व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा