नवे दानवाड आश्रमशाळेत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

 प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

नवे दानवाड प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम होते. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले कलाम यांनी आपल्या बालपणात अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांनी घरखर्चासाठी वर्तमानपत्र विकणे व इतर छोटे-मोठे कामे करून कुटुंबाला आधार दिला.

कलाम यांनी रामानाथपुरम येथे शालेय शिक्षण घेतले आणि पुढे ते भारताचे शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. भारतीय अंतराळ संशोधन आणि मिसाईल विकासात त्यांचे मोठे योगदान होते. भारतरत्न सन्मानित डॉ. कलाम यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचे योगदान विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले.

या जयंती कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित विचारमंथन झाले. मुख्याध्यापकांनी त्यांच्या विचारांचे महत्व पटवून दिले, तर विद्यार्थ्यांनी भाषणे देत त्यांच्या आदर्शांचा गौरव केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष