बोरगाव येथील रवीवार आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य, पूर्ववत जागेवरच बाजार भरवा : नगरसेवक शरदराव जंगटे



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 बोरगाव येथील रवीवार आठवडी बाजार हा पूर्ववत जागेवरून शहराच्या बाहेरील बाजूस नव्याने भरविला जात आहे.सदर बाजार ठिकाणाच्या मार्गावर दोन्ही बाजूने घाणीचे साम्राज्य विखुरले आहे.शिवाय या बाजाराचे ठिकाण हे गावभागापासून दूर अंतरावर असल्याने विशेषतः महिला वर्गांला याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे सदर बाजाराचे ठिकाण बदलून पुन्हा शहराच्या मध्यभागी पूर्ववत जागेवरच भरावा अशी मागणी नगरसेवक शरद जंगटे यांनी केली आहे.

        बोरगाव येथे आठवड्यात रविवार,बुधवार असे दोन बाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरले जातात.शहराबरोबर परिसरातील गावाच्या लोकांचा वावर या बाजारपेठेत अधिक प्रमाणात असल्याने परिणामी या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे पहावयास मिळते. येथील रविवारी आठवडी बाजार हा शहराच्या मध्यभागी प्रमुख रस्त्यावर एपीएमसी मार्केट समोर असलेल्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून भरवला जात असायचा. पण काही दिवसांपासून हा आठवडी बाजार कोणतेही कारण नसताना या-ना - त्या कारणावरून शहराच्या बाहेरील बाजूस येणाऱ्या व स्मशानभूमी पासून जवळच असलेल्या जागेवर भरवला जात आहे. त्यामुळे गावातील बाजार करणाऱ्या प्रत्येक महिला वर्गाबरोबर ज्येष्ठांना ही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्याचबरोबर या आठवडी बाजारामुळे मार्गावर पुन्हा घाणीचे साम्राज्य प्रस्थापित होऊन परिसरात असलेल्या सरकारी शाळेभोवती दिवसेंदिवस दुर्गंधी पसरत घाणीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे.परिणामी शालेय विद्यार्थ्यांनाही याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सद्य स्थितीत भरवण्यात येणारा हा आठवडी बाजार या जागेवरून स्थलांतरित करून शहराच्या मध्यभागी असणाऱ्या एपीएमसी मार्केट परिसरातच भरवावा अन्यथा आपण आंदोलन शहरवासीयांना सोबत घेऊनच रस्त्यावर उतरू असा इशारा शेवटी नगरसेवक शरदराव जंगटे यांनी दिला आहे.

       यावेळी जितू पाटील, जिन्ना अम्मनवर,प्रकाश पाटील,अजित तेरदाले, अमित माळी,अजित कांबळे,राजू लटलटे,महावीर चोकावे-पाटील,अमोल पाटील,बहुबली पाटील,दर्शन चौगुले,राजू कुंभार,धवल भिवरे,उत्तम कदम,गुंडा गोरवाडे,यांच्यासह भाजप कार्यकर्ते व शहरवाशीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष