बोरगाव येथे जय गोमटेश विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघास मंजुरी : चेअरमन शरदराव जंगटे यांची माहिती
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री,आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष सहकार्याने शेतकऱ्यांचां विकास व प्रगतीसाठी नव्यानेच बोरगांव मध्ये श्री जय गोमटेश विविध उद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संघास मंजुरी मिळाली असल्याची माहिती संघाचे चेअरमन शरदराव जंगटे यांनी दिली.
भागातील शेतकरी व सातबारा धारकांच्या उद्धारासाठी शिवाय शासनाच्या विविध शासकीय योजनांचा सर्वाधिक लाभ तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व बोरगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या या प्राथमिक विविध उद्देशीय सहकारी संघाचा शुभारंभ लवकरच जोल्ले दाम्पत्यांच्या सह जिल्ह्यातील नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे संस्थेचे संचालक प्रशांत गुंडे यांनी सांगितले.
शहरासह पंचक्रोशीतील जे शेतकरी अद्याप अशा शासकीय पीक कर्जा योजनेपासून दूर आहेत.अशा सर्व सातबारा धारक शेतकऱ्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्राचा पुरवठा करून शासनाच्या मिळणाऱ्या आर्थिक पत व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शरद जंगठे यांनी केले आहे.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष शितल चौगुले, संचालक प्रशांत गुंडे ,शीतल सोबाने, महावीर पाटील,भाऊसाहेब पाटील,भरमा कुडचे,बाळासाहेब उरुणकर,शकुंतला वाघमोडे ,सारिका पाटील,अजित कांबळे, ,जितेंद्र भोजे पाटील, ,अजित तेरदाळे, शंकर गुरव, शिशु ऐदमाळे,महपती खोत, अर्जुन हुडेद,संजय महाजन ,भूपाल महाजन आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा