कॅन्सर मुक्तीसाठी सेंद्रिय शेती व देशी गाय संगोपन गरजेचे : माधवराव घाटगे



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 गुजरातमध्ये गोमुत्रामुळे कॅन्सर रोग बरा झाला तसा शिरोळ तालुका कॅन्सर मुक्त करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी देशी गाय पाहिजे. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्यास मदत होईल असे प्रतिपादन, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले 

    कुरुंदवाड येथे रामेश्वर कृषी विकास विज्ञान मंडळाच्यावतीने गायीचे पूजन व गोरक्षकांचा सत्कार मान्यवरांचा सत्कार केंद्र व राज्य सरकार गाईसाठी पन्नास रुपये अनुदान दिल्याबद्दल जाहीर आभार कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना ते बोलत होते. गायींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री घाटगे म्हणाले, वीस वर्षांपूर्वी ज्वारी सोयाबीन हरभरा ऊस इत्यादी पिके जोमाने येत होती. ऊस ७०-८० टन उत्पादन निघत होते. जमिनीची सुपीकता व ताकद होते. रासायनिक खते आली. कीटकनाशके, औषधे यामुळे जमिनीचा कस बिघडत चालला आहे. ८० टन उत्पादन घेण्यासाठी गोमूत्र सेंद्रिय शेती ताकद यांच्या हिरव्या खताचा वापर करून शेती करावे. 

    जमिनीत कस वाढतो उत्पादनही वाढते. रासायनिक खतामुळे शेतीला विहिरीला पाणी पितो त्यामुळे कॅन्सर रोगास सामोरे जात आहोत. देशी गाईचे दूध लोणी, पनीर आरोग्यास उपयुक्त आहे. सौ मनीषा डांगे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात रामचंद्र डांगे म्हणाले, गेली सहा वर्षे झाली ७० देशी गाईंचे संगोपन करीत आहे. चारा शेणखत दूध यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून हा मार्ग स्वीकारला. 

    यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ.नीता माने ,संजय शिरटीकर, विनायक कुलकर्णी, जिल्हा परिषद माजी सदस्य विजय भोजे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर , गुरुदत्त शुगर्स चे संचालक शिवाजीराव माने -देशमुख, शिवाजी सांगली , माजी नगरसेवक उदय डांगे, शंकरराव बिराजदार, माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, रमेश भुजुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष