पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढविणार - स्नेहा वसंतराव देसाई
पुणे येथे कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
विधानसभा निवडणुकीची तयारी आणि मोर्चे बांधणी सर्वच पक्षात जोरात सुरू आहे.सर्वच पक्ष विधानसभेच्या जागांची चाचपणी करीत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. इच्छुकांनी आपआपली मते, व्यूहरचना विशद केली.दरम्यान शिरोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सौ. स्नेहा वसंतराव देसाई यांनी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते एकमेव उमेदवारी मागणी केलेली आहे.त्यासाठी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील आग्रही आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार,खा. सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या.
या पार्श्वभूमीवर सौ.स्नेहा वसंतराव देसाई म्हणाल्या की,शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून पक्षाची ध्येयधोरणे व विचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.लोकसभा निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेवून प्रचाराचा शुभारंभ करून मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहे.सासरे स्वर्गीय रामचंद्र देसाई व पती वसंतराव देसाई यांच्या बहुजन समाजाशी असलेली नाळ,विकासाभिमुख विचारांचा वारसा पाठीशी आहे.महिलांवरील सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या घटना,महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी,महिलांच्या प्रश्नांना समर्थपणे एक महिलाच समजून घेवून अधिक तत्परतेने व गांभीर्याने मांडू शकते यासाठी पक्षनेतृत्वाकडे शिरोळ विधानसभेची उमेदवारी मागितली आहे.पक्षनेतृत्वाने संधी दिल्यास निवडणूक लढविणार असल्याचे सौ. स्नेहा वसंतराव देसाई यांनी सांगितले.

उत्तम महत्वकांक्षा
उत्तर द्याहटवा