परिवर्तन महाशक्ती आघाडीचा शिरोळ तालुक्यातील कोण उमेदवार ?
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुका विधानसभा निवडणुकीसाठी "परिवर्तन महाशक्ती" आघाडीने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. या आघाडीत प्रामुख्याने बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती यांसारख्या नेत्यांचा सहभाग आहे. महाराष्ट्राच्या प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देण्याच्या उद्देशाने ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये दिग्गज अनेक नेते एकत्र आले आहेत. दरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या आघाडीला साथ दिली तर आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
शिरोळ तालुक्यात शेट्टी स्वतः निवडणूक लढवणार की कार्यकर्त्यांना संधी देणार, यावर अनेकांच्या नजरा आहेत. मात्र, शिरोळ तालुका हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असल्याने दानोळीतील स्वाभिमानीचे शिलेदार राम शिंदे, हेरवाडचे बंडू पाटील आणि शिरोळचे सचिन शिंदे यांच्या नावाची चर्चा असून लवकरच परिवर्तन महाशक्तीचा उमेदवार निश्चित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
परिवर्तन महाशक्तीने राज्यातील जनतेला नवीन पर्याय देण्याचा निश्चय केला आहे. या आघाडीत सहभागी झालेल्या पक्षांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. .
या निवडणुकीत शिरोळमधील राजकीय वातावरण तापले आहे. शिरोळमधील या आघाडीची रणनीती आणि प्रचार यावर यश अवलंबून असेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा