सन्मति विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे दिला मतदानाचा संदेश

अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

 तारदाळ येथील सन्मति विद्यालयात पोस्ट कार्डातील पत्राद्वारे विद्यार्थ्यांनी जनतेला मतदानाचा संदेश दिला.  तहसील कार्यालय हातकणंगले अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम या अंतर्गत उपक्रम राबवण्यात आले मुख्याध्यापक श्री सी.जी तेरदाळे यांनी मतदान जनजागृतीपर आधारित पत्राद्वारे जनजागृती उपक्रमाचे कौतुक करून मतदानाचा अधिकार व लोकशाही यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. 

     यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांना, समाजाला मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आई-वडील, पालक यांना सजग करावे व आपल्या मतदानाच्या अधिकारातून विधान सभा प्रतिनिधी निवडावा. भारतीय संविधानाने नागरिकाला मतदानाचा सर्वश्रेष्ठ हक्क प्रदान केला आहे या हक्काचा सर्वांनी उपयोग करावा असे सांगितले. मोहन बाळकृष्ण नर्मदे पोस्टमन स्वतः शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यां कडून पत्रे स्वीकारले या उपक्रमासाठी श्री जितेंद्र अनुजे ,सौ ए. ए. हिंगलजे. श्री पी एन मगदूम श्री विकास बरगाले सौ वंदना कुंभोजकर यांनी परिश्रम घेतले विद्यालयाचे या कार्याचे पर्यवेक्षक श्री.पी.बी शेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष