जिल्हास्तरीय हातोडा फेक स्पर्धेत सानिका केरीपाळे प्रथम


 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड ची विद्यार्थिनी सानिका केरीपाळे हिने वारणानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हातोडा फेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

        वारणानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हातोडा खेळ प्रकारात श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कला शाखेची विद्यार्थिनी सानिका केरीपाळे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. शालेय समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

     या विद्यार्थीनीस संस्थेचे संचालक मा .श्री. गौतम पाटील ,कार्याध्यक्ष मा. श्री .गणपत दादा पाटील, उपसंचालक श्री .बी .आर थोरात, उपसंचालक श्री.डी. एस माने ,शाखेचे कार्याध्यक्ष श्री. माने गावडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .रावसाहेब पाटील, सदस्य श्री.दामोदर सुतार , सदस्या श्रीमती विनया घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा श्री आर जे पाटील, क्रीडाशिक्षक श्री .एस. एस गडदे ,महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष