बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा सभासदांना १६ टक्के लाभांश - चेअरमन अण्णासाहेब हवले

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

            बोरगाव येथे श्री सिद्धेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी मार्फत चालू आर्थिक वर्षात सभासदांना 16 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केल्याने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आण्णासाहेब हवले यांनी दिली.

     सन 1999 साली शेतकऱ्यांचा उद्धार आणि पंचक्रोशीचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने सहकार नेते व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनी श्रीन सिद्धेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना केली.सभासद हा संस्थेचा सहकार क्षेत्रातील मूलभूत कणा समजून संस्थेबरोबर सभासदांचे हि हित जोपासले पाहिजे या उद्देशाने अण्णासाहेब हवले यांनी सहकारी संचालकांच्या मदतीने संस्था स्थापनेपासून आजतागायत सर्वाधिक 16 टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.त्यामुळे श्री सिद्धेश्वर पतसंस्था म्हणजे केवळ बोरगाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सहकार क्षेत्रात सभासदांचे हित जोपासणारी एकमेव संस्था असल्याचेही अनुभवास येत आहे.अशा या संस्थेमध्ये एकूण 16 शाखेच्या 3465 सभासदांना,24 लाख,82 हजार 400 रुपये रक्कम संस्थेमार्फत लाभांश रुपाने सभासदांना दिली जात आहे.त्यामुळे सभासदांकडून संस्थेसह संस्थाचालकांचे ही गोड कौतुक केले जात आहे.शिवाय नुकताच संस्थेचा रोप्य महोत्सव कार्यक्रम पार पडला आहे.त्याच पार्श्वभूमीवर सभासदांना आठवण म्हणून संस्थेमार्फत देऊ केलेल्या भेट वस्तूंचेहि वितरण हि या निमित्ताने लाभांशाबरोबर करण्यात येत असल्याचे संस्था प्रधान व्यवस्थापक संजय हवले यांनी सांगितले आहे.

      त्याचबरोबर एखादी संस्था प्रगतीपथावर पोहोचण्यास संस्थाचालकांच्यासह सभासदांबरोबर ठेवीदारांचा हि मोलाचा वाटा असतो.त्यामुळे अशा ठेवीदारांच्या ठेवीवर व्याज दरात अर्ध्या टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने विशेष व्याजदर योजनेत 13 महिन्यास 10 टक्के,15 महिन्याला 10.50 टक्के,18 महिन्याला 11 टक्के प्रमाणे वाढीव करण्यात आले असून या वाढीव व्याजदर योजनेचा फायदा ठेवीदारांनी 31 डिसेंबर अखेरपर्यंत घ्यावा असेही शेवटी चेअरमन अण्णासाहेब हवले यांनी सांगितले. आयोजित पत्रकार बैठकीस अनुज हवले, सुकुमार चिप्रे, शिवाप्पा माळगे,विद्याधर अमन्नावर,सुरेंद्र पाटील,आण्णासाहेब मालगावे,रामचंद्र फिरगनावर, सुभाष गोरवाडे,बाबासाब बंकापुरे,रशीद मोमीन,सौ स्मिता माळी,सौ पद्मश्री बंकापुरे,विजयकुमार शिंगे, संजय हवले उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष