स्वाभिमानीचे आंदोलन सम्राट विश्वास बालिघाटेंसह शिरढोण येथील पदाधिकाऱ्यांचा यड्रावकर गटात प्रवेश
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेला रामराम ठोकून यड्रावकर गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. स्वाभिमानीचे आंदोलन सम्राट विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी संघटनेचा सोडचिठ्ठी दिली असून, त्यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यात प्रमुखपणे विश्वास बालिघाटे, दादासो चौगुले, रूपचंद शिंदे, विलास चौगुले, संजय मालगावे, तानाजी पुजारी, रावसो चौगुले (शिवमूर्ती), महावीर गौराजे, रावसो यमगर, बाबासो मालगावे, राजू पाटील (हसुरे), भीमराव बेबडे, प्रकाश जाधव, आनंदा घोरपडे, स्वप्निल सिदनाळे, जगन्नाथ बीरोजे, दादासो न्हावी, दिगंबर शिंदे, मनोहर मुजगोंडा, शितल दनाने यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा