शिरोळ मतदारसंघात निवडणूक निरीक्षक विश्वमोहन शर्मा यांची भेट

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक विश्वमोहन शर्मा यांनी आज भेट देऊन निवडणूक तयारीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी मीडिया कक्ष, आचारसंहिता कक्ष, मोजणी सेंटर, डिस्पॅच सेन्टर आणि स्ट्राँग रूमची पाहणी केली. त्यांनी निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या सर्व सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत, प्रत्येक विभागाच्या कार्यप्रणालीसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी निवडणूक निरीक्षक शर्मा यांनी निवडणूक प्रक्रियेत नियोजनाबाबत सूचना दिल्या. विशेषतः स्ट्राँग रूमच्या संरक्षण व्यवस्थेची बारकाईने तपासणी करून सुरक्षा बळकटीवर भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी मतदान आणि मोजणीच्या प्रक्रियेतील आवश्यक खबरदारी उपाय व कर्मचारी व्यवस्थापनाबाबतही मार्गदर्शन केले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी नष्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष