मी यड्रावकर गटात याआधीच प्रवेश केलेला असून यापुढेही यड्रावकरांकरिताच काम करणार- विश्वास बालीघाटे.

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची विकासात्मक दृष्टीकोन पाहून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे लोकप्रिय आमदार मा.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत राहण्याचा मी व माझ्या इतर सहकार्यांनी ठरविलेले असून यापुढेही त्यांच्यासाठीच काम करत राहणार,काल जो प्रकार घडला तो लोकांत गैरसमज पसरवणारा होता,काल जबरदस्तीने माझ्या छातीला बिल्ला लावून लोकांत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला गेला,कृपया याबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नये मी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर  साहेबांसोबत एकनिष्ठ असून याबाबत मी आमदारसाहेबांशी भेटून माझी भूमिका स्पष्ट केली आहे.यावेळी दिलीप पाटील,विलास चौगुले,रूपचंद शिंदे,शितल दनाने,संजय मालगावे,रावसाहेब यमकमरडे,बाळू तेरदाळे,राजू हसुरे,रावसाहेब शिवमुर्ती,महेश गौराजे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष