शिरोळ तालुक्यात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा : युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर

 


दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क : 

शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील जनतेसाठी विविध विकासकामांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत, त्यांनी आधुनिक आरोग्य सुविधांची उभारणी केली आहे. त्यांच्या या योगदानामुळे शिरोळ तालुका आज विकासाचे एक आदर्श मॉडेल बनले आहे, असे गौरवोद्गार युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले.

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आदित्य पाटील यड्रावकर यांनी दानोळी येथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना आमदार पाटील यांना पुढील काळातही पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आमदार डॉ. पाटील यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे तालुक्यातील विविध सोयी-सुविधांमध्ये प्रगती साधली गेली आहे. विशेषतः आरोग्य सुविधा निर्माण करून त्यांनी तालुक्यात आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यापुढे शिरोळ तालुक्यात विकासाची गंगा वाहत ठेवण्यासाठी आणि शिरोळ तालुका एका विकासाच्या उंचीवर पोहोचवण्यासाठी आमदार यड्रावकर साहेबांना यापुढेही साथ द्यावी, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

यावेळी पैलवान उदय राऊत, धन्यकुमार पाराज, सिताराम माने, अनिल कांबळे, पी.आर. सावंत, बाबासो तांबोळी, असिफ तांबोळी, अजय राऊत, धन्यकुमार उर्फ पिटू पराज, संजय परमाप्पा, विकास वाळकुंजे, स्वप्निल पवार, राहुल पवार, भाऊसाहेब दळवी, जनार्दन लोहार आणि इरफान तांबोळी यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष