गृहमतदानात जिल्ह्यात 4 हजार 637 पैकी 4 हजार 430 मतदान



कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या गृहमतदानाला दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. आज उर्वरित मतदान झाल्यानंतर एकूण 4 हजार 637 मतदारांपैकी 4 हजार 430 येवढ्या मतदारांनी मतदान केले.

भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत.


          विधानसभा संघनिहाय गृह मतदारांची संख्या व एकूण मतदान पुढीलप्रमाणे आहे. 

271- चंदगड 541 पैकी 513,

272- राधानगरी 664 पैकी 633,

273- कागल 738 पैकी 717,

274- कोल्हापूर दक्षिण 527 पैकी 509,

275- करवीर 428 पैकी 410,

276- कोल्हापूर उत्तर 470 पैकी 444,

277- शाहुवाडी 447 पैकी 422,

278- हातकणगंले 176 पैकी 169,

279- इचलकरंजी 229 पैकी 224,

280- शिरोळ 417 पैकी 389 मतदारांनी मतदान केले. 


       मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या जिल्ह्यातील वय वर्ष 85 पेक्षा जास्त वय असलेल्या 3 हजार 882 मतदारांपैकी 3 हजार 700 जणांनी, 737 दिव्यांग मतदारपैकी 713, अत्यावश्यक सेवेतील 18 मतदारांपैकी 17 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष