दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी श्री स्वामी समर्थ गुरुपीठात ९ डिसेंबरपासुन श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

 नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये दत्तजयंतीनिमित्त सोमवार दि.९ ते १६ डिसेंबर अखेर सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह,अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह,महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (नाशिक)चे पिठाधीश परमपुज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापुर,पिठापुर,त्र्यंबकेश्वर या चार गुरुपीठात तसेच देश-विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाचवेळी सप्ताह होणार आहे.

     सप्ताहामध्ये रविवारी दि.८ डिसेंबर रोजी ग्रामदेवता सन्मान,मंडल मांडणी होईल. सोमवार दि.९ रोजी मंडल स्थापना,अग्निस्थापना,स्थापित देवता हवन, सामुहिक श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात होईल.मंगळवार दि.१० रोजी नित्यस्वाहाःकार,श्री गणेश याग व मनोबोध याग होईल.बुधवार दि.११ रोजी नित्यस्वाहाःकार व गीताई याग होईल.गुरुवार दि.१२ रोजी नित्यस्वाहाःकार व श्री स्वामीयाग होईल.शुक्रवार दि.१३ रोजी नित्यस्वाहाःकार व चंडीयाग होईल.शनिवार दि.१४ रोजी नित्यस्वाहाःकार व रुद्रयाग व मल्हारी याग होईल. रविवार दि.१५ रोजी नित्यस्वाहाःकार व बलिपुर्णाहुती होईल.दुपारी १२:३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव होईल.सोमवार दि.१६रोजी श्री सत्यदत्त पुजन,देवता विसर्जन,अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह सांगता होईल.

    दैनदिन कार्यक्रमामध्ये सकाळी आठ वाजता भुपाळी आरती,सव्वाआठ वाजता नित्यस्वाहाःकार होईल.साडेआठ ते दहा वाजेपर्यंत सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन होईल.साडेदहा वाजता नैवेद्य आरती,यानतंर विशेष याग होतील.

  दुपारी दोन ते साडेपाच वाजेपर्यंत श्री दुर्गासप्तशती,श्री स्वामीचरित्र सारामृत वाचन होईल.सांयकाळी सहा वाजता औंदुबर प्रदक्षिणा,साडेसहा वाजता नैवेद्य आरती,सात वाजता विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन,साडेसात वाजता नित्यसेवा,नित्यध्यान असे कार्यक्रम होतील.

 सप्ताहाकाळात अखंड २४ तास प्रहरीची सेवा सुरु राहणार आहे.सप्ताहाकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक,श्री स्वामी सेवक,भक्तानी लाभ घ्यावा.तसेच ज्या भाविकांना सप्ताहानिमित्त अन्नदान करण्यासाठी धान्य,वस्तु,पदार्थ,देणगी द्यावयाची आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दत्तजयंतीनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,दत्तधाम मध्ये जिल्ह्यासह परजिल्ह्यातुन पारायण सप्ताहासाठी येणार्‍या सर्व सेवेकरी, भाविकांची राहण्याची सोय विनामुल्य करण्यात येणार आहे.यासाठी सर्व सेवेकर्‍यांना नांव नोदणी करणे बंधनकारक आहे.  जे सेवेकरी सप्ताहामध्ये पारायणाला बसणार आहेत त्यांनी खालील link द्वारे नांव नोदणी करावी http://bit.ly/dattajayantisaptah अथवा मोबाईल क्रमांक ९२२६५३८४२७ संपर्क साधुन नांव नोदणी करावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष