राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ तालुक्याचा चेहरा - मोहरा बदलतील : पालकमंत्री हसन मुश्रीफ
आमदार यड्रावकर यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाडमध्ये जंगी सभा
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबद्दल मी वचन देतो की या निवडणुकीत त्यांना विजयी करून तालुक्याच्या विकासासाठी संधी द्यावी, ते तुमची सेवा करतील आणि शिरोळ तालुक्याचा चेहरा - मोहरा बदलतील. आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोहोच पावती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कुरुंदवाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे होते.
यावेळी नामदार मुश्रीफ म्हणाले, लाडक्या बहिणी अनुदान योजनेला स्थगिती देण्यासाठी विरोधी पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल करून बंद पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महायुतीचा महिलांच्या प्रति असणारा हा उपक्रम चांगला आणि योग्य असल्याचे ठरवत ही योजना चिरंतन सुरू ठेवण्याचा निर्वाळा दिला आणि ही योजना कायम राहिली. महिलांचे हित पाहणाऱ्या पक्षातील घटक पक्षाचे आम.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असे सांगून त्यांनी शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.
ते पुढे म्हणाले, आमदार यड्रावकर हे चालाख आहेत. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या तालुक्यात १ हजार ९०० कोटी रुपयांची विकास कामे खेचून आणली आहेत. राज्य शासनाने महिलांना अधिकार आणि सन्मान देऊन त्यांचा आदर राखला आहे. यापुढेही सरकार महिलांच्यासाठी विविध योजना अमलात आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम महायुती सरकार करेल. सरकारने नुकतेच १ लाख सरकारी नोकऱ्यांची आदेश काढले आहेत. याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांसाठी योजना यामुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार असून लाडकी बहीण योजनेची रक्कम ३ हजार करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, पाच वर्षात १ हजार ९०० कोटी रुपयांचा निधी आणून शिरोळ तालुक्याचा चौफेर विकास साधला आहे. विरोधकांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने वैचारिक पातळी सोडून टीका केली जात आहे. मी केलेल्या विकास कामाच्या जोरावरच आज मत मागण्यासाठी समोर उभा आहे. स्वर्गीय देशभक्त रत्नाप्पांना कुंभार, स्वर्गीय सारे पाटील, बाळासाहेब माने, शामराव पाटील यांचा विधायक आणि विकासात्मक वारसा पुढे नेला आहे.
विजय भोजे म्हणाले, संविधान बदलणे ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही. हाच आधार घेऊन विरोधकांचा प्रचार सुरू आहे.
दशरथ काळे म्हणाले, महाराष्ट्र राज्याची निवडणूक सुरू असून सीमा भागावरील कर्नाटक राज्यातील मंत्री महोदय व माजी आमदारांना आणून या ठिकाणी प्रचार केला जात आहे. अशी वेळ विरोधकांच्यावर आली आहे. ज्यांच्याकडे विकासाचे काम नाही ते फक्त विकासाचे काम करणाऱ्या आमदार यड्रावकर यांच्यावर टिकेचे आग पाखडत आहेत.
माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील जास्तीत जास्त सत्तेतील सरकारच्या योजनेतील विज बिल माफी यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासण्याचे काम केले आहे.
माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे म्हणाले, शहराचा चौफेर विकास राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी साधला आहे. कुरुंदवाड शहराला 31 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ते आमदार होणारच आहेत. कुरुंदवाड पालिकेतही राजेंद्र पाटील यांची सत्ता येईल.
यावेळी स्वागत दादासाहेब पाटील यांनी केले.यावेळी सतीश मलमे,बबनराव यादव,अँड.ममतेश आवळे, श्रीकांत माळी, चंद्रकांत जोंग, रामचंद्र मोहिते, शहानवाज पिरजादे, सुनील कुरुंदवाडे,प्रा.चंद्रकांत मोरे,भोला कागले,मनीषा डांगे आदींनी भाषणे केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, बबन यादव, ॲड. मंतेश आवळे, श्रीकांत माळी, चंद्रकांत जोंग, शहानवाज पिरजादे ' सुनील कुरुंदवाडे, चंद्रकांत मोरे, बोला कागले, मल्लाप्पा चौगुले, विद्याधर कुलकर्णी, सतीश मलमे, अमर कुंभार, मनीषा डांगे यांची मनोगते झाली.
यावेळी माधुरी टाकारे, मुकूंद गावडे, प्रभाकर बंडगर, लियाकत बागवान, टिकाखान पठाण, मिरअहमद बागवान, दादासाहेब पाटील, जय कडाळे, जवाहर पाटील, अक्रम पट्टेकरी, गौतम ढाले, खुतूब भुसारी, रविकिरण गायकवाड, भिमराव पाटील, अनुप मधाळे, सद्दाम तहसिलदार, किरण आलासे, अर्षद बागवान, दिपक पोमाजे, दिपक गायकवाड, महावीर पाटील, भोला कागले, इकबाल लिंबू, सुरेश बिंदगे, दादेपाशा पटेल, दानवाडचे सरपंच सी.डी. पाटील, विद्याधर कुलकर्णी, बाळासाहेब दिवटे, शरद आलासे, जैनून बागवान, फारूक जमादार, उदय डांगे, अक्षय आलासे, भिमराव पाटील, अशोक घोरी, त्रिशला पाटील, रमेश चौगुले, सुनिल कुरुंदवाडे, मल्लापाण्णा चौगुले, सरपंच शफी पटेल, बाबासो पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
अजान आणि पावसाचे शुभसंकेत
नामदार मुश्रीफ हे भाषण करण्यासाठी उठताच आजान व पावसाला सुरुवातच झाल्याने जणू काही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचे शुभ संकेत मिळाले, असे वातावरण सभे ठिकाणी निर्माण झाले होते.
दशरथ काळेंचा हल्लाबोल
ही निवडणूक महाराष्ट्राची आहे की कर्नाटकाची आहे, असे आपल्या भाषणाला सुरुवात करून दशरथ काळे म्हणाले, विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठी कर्नाटकातून मानसी आणि गाड्या आणल्या जात आहेत इतकेच नव्हे तर मंत्र्यांची हजेरी सुद्धा लागत असल्याने ही निवडणूक महाराष्ट्राची आहे की कर्नाटकची असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपस्थित करून त्यांना शिरोळ तालुक्यातील माणसे मिळत नाहीत का असा सवाल उपस्थित केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा