बोरगाव येथे आ.शशिकला जोल्ले यांच्या वाढदिवसा निमित्त जीवनावश्यक किटचे वितरण
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
निपाणी मतक्षेत्राच्या लोकप्रिय आमदार व कर्नाटक राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री आम शशिकला जोल्ले (वहिनी) यांच्या 55 व्या वाढदिवसा निमित्त हालशुगर कारखान्याचे संचालक व बोरगावचे विद्यमान नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या वतीने येथील अपंग निराधार व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
बोरगाव येथील एकंदरीत 30 अपंग तथा निराधार लाभार्थ्यांना व टेक्सटाईल पार्क येथील जवळपास 35 गरजू लोकांना असे एकूण 65 कुटंबियाना या जीवनावश्यक किटचे वाटप नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या पुढाकाराने आमदार जोल्ले प्रेमी गटाकडून करण्यात आले आहे.
आमदार जोल्ले दाम्पत्यानी आपल्या कार्य व कर्तुत्वाच्या जीवावर निपाणी मतदारसंघाचा कायापालट केला. बरोबरीने बोरगाव शहरासाठीही भरीव निधी उपलब्ध करून देऊन मूलभूत समस्या मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न केला.याची दखल घेऊन अशा या कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकप्रतिनिधींच्या वाढदिनी आपण हा छोटासा उपक्रम राबवून निराधाराना या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचे नगरसेवक शरदराव जंगटे यांनी सांगितले.
यावेळी भाजप कार्यकर्ते महिपती खोत,जितू पाटील,अजित तेरदाळे,महादेव नेजे,सेसू ऐदमाले,उत्तम कदम,अमित माळी,प्रकाश पाटील,बबन रेंदाळे,फिरोज अपराज,राजू लटलटे,जिनू आम्मन्नावर, संजय महाजन,भूपाल महाजन,किसन गोसावी,सर्जेराव धनवडे,वसंत गजरे, महादेव ऐदमाळे यांच्यासह अन्य मान्यवर, शहरवासीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी करून आभार जितेंद्र भोजे-पाटील यांनी मानले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा