शिरढोणमध्ये ८१.८८ % चुरशीने मतदान

हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क : 

   २८० शिरोळ विधानसभा मतदार संघातील शिरढोण(ता.शिरोळ) येथे अत्यंत चुरशीने ८१.८८टक्के मतदान शांततेत पार पडले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

     एकूण ७४२३मतदार आहेत त्या पैकी ६०७८मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.महायुती,महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आधिकाधिक मतदान होण्यासाठी मतदान केन्द्रा पर्यंत मतदारांना घेऊन जाण्याची जणू चुरस लागली होती यामुळेच ८१.८८टक्के मतदान होऊन शिरोळ विधानसभा मतदार संघातील सर्व उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले. असून आता सर्वांच्या नजरा शनिवार २३नोव्हेंबर रोजीच्या निकालाकडे लागल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष