दत्तवाड येथे ८०.५० टक्के चुरशीने मतदान


इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. दत्तवाड येथे सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान ला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. दुपारी उन्हाच्या झळा लागत असल्याने सकाळी सकाळी मतदान करावे या हेतूने अनेकजण आलेले होते. त्यामुळे दत्तवाड येथील मतदारांनी सकाळी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

दत्तवाड येथे एकूण ७७३५ झालेले मतदान ६२२९ असे सरासरी ८०.५० टक्के मतदान झाले.

दत्तवाड येथील जुनी ग्रामपंचायत, कुमार व कन्या शाळा, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह, आ.ना.नेजे हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली होती. मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास पोलिसांकडून मज्जा होत होता. त्यामुळे बहुतेक नागरिकांनी आणलेले मोबाईल बाहेर असलेल्या स्वयंसेवकाकडे ठेवून मतदानाला जात असल्याची दिसून येत होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष