शिरोळ ऊरुसानिमित्त चित्तथरारक शर्यती ; अमित संकपाळ यांची बैलगाडी प्रथम
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस सोमवार पासून मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरू झाला आहे. उत्सव आणि उरूसानिमित्त आयोजित केलेल्या गावातील दुबैली गाड्यांच्या शर्यतीत अमित संकपाळ यांची बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला.गावातील घोडागाडी शर्यतीत बबलू शेट्टी यांची घोडागाडी, तर बिनदाती व दोनदाती बैलगाडी शर्यतीत अभिषेक कोळी यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते निशान रोख रक्कम आणि कायम चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त सोमवारी व मंगळवारी विविध स्पर्धा आणि शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धा व शर्यती पाहण्यासाठी शर्यती शौकिनांची येथील कनवाड रस्त्यावरील मिठारगी व अर्जुनवाड रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. महिला व पुरुष रांगोळी, सायकल, मॅरेथॉन स्पर्धा. तसेच गावमर्यादित दुहेरी कॅरम स्पर्धा, व्हाॅलीबॉल स्पर्धा, मोटरसायकलबरोबर रेडकू पळविणे, मोटरसायकलबरोबर म्हैस पळविणे, या स्पर्धा. त्याचबरोबर गावातील बिनदाती व दोनदाती बैलगाडी, गावातील घोडागाडी, गावातील दुबैली गाड्यांच्या शर्यती संपन्न झाल्या. या स्पर्धेचे व शर्यतींचे उत्सव व उरूस संयोजन समितीने उत्कृष्ट नियोजन केले. शासनाच्या परवानगीने अटी व नियमास अधीन राहून सर्व शर्यती विना लाठी काठी संपन्न झाल्या.
झालेल्या शर्यतीचा व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- गावातील दुबैली गाडी शर्यत- प्रथम अमित संकपाळ, द्वितीय- संग्राम जगदाळे,तृतीय- संजय धाबाडे.गावातील बिनदाती व दोनदाती बैलगाडी - प्रथम - अभिषेक अमर कोळी, द्वितीय - सुमित बजरंग इंगळे, तृतीय - अनिकेत बन्ने. गावातील घोडागाडी - प्रथम बबलू शेट्टी, द्वितीय- साजिद शेख, तृतीय- बबलू शेट्टी.
महिला रांगोळी स्पर्धा - प्रथम- प्राजक्ता गणेश साळुंखे (जयसिंगपूर), द्वितीय - रंजना युवराज महाळुंगेकर (शिरटी), तृतीय - मिताली बापुराव सुतार (जयसिंगपूर) पुरुष रांगोळी स्पर्धा - प्रथम - सुरेश मलगोंडा छत्रे (अकिवाट), द्वितीय- विकास निळकंठ गायकवाड (वारणा कोडोली), तृतीय- ओंकार चन्नाप्पा नरळे (सांगली), उत्तेजनार्थ - अशोक राजाराम संकपाळ (शिरोळ). व्हाॅलीबॉल स्पर्धा -प्रथम-जयसिंगपूर स्पोर्ट्स जयसिंगपूर, द्वितीय-कबनूर स्पोर्ट्स कबनूर, तृतीय - केर्लि स्पोर्ट्स केर्लि. मोटरसायकलबरोबर रेडकू पळवीणे प्रथम-कै. शंभू गवळी (मिरज), द्वितीय- प्रमोद गवळी (मिरज), तृतीय - समर्थ गवळी, (मिरज), चतुर्थ - रामचंद्र हराळे, पाचवा - शिवाजी हराळे. मोटरसायकलबरोबर म्हैस पळविणे-प्रथम- विनायक पवार द्वितीय- संजय तोडसकर, तृतीय- विश्वजीत गवळी. गाव मर्यादित दुहेरी कॅरम स्पर्धा - प्रथम- अरुण चुडमुंगे आणि अमर चुडमुंगे, द्वितीय-राजु कोळी आणि अतिष बिंदगे, तृतीय- पंकज इंगळे आणि अक्षय पाटील उत्तेजनार्थ - बबलु उर्फ सत्यजित काशिद आणि संजय कोळी. पुरुष सायकल स्पर्धा - प्रथम -अभिजीत भंडारे, द्वितीय - यश देवकुळे, तृतीय- बाळू हिरेमठ, उत्तेजनार्थ- राम जाधव. महिला सायकल स्पर्धा - प्रथम - वैष्णवी पाटील, द्वितीय - साक्षी धायगुडे, तृतीय - तेजस्विनी कोळेकर, उत्तेजनार्थ संतोषी जांबुटकर पुरुष मॅरेथॉन स्पर्धा - प्रथम - अभिनंदन सूर्यवंशी, द्वितीय - सुमंत राजमर, तृतीय - महादेव पळेकर, उत्तेजनार्थ- स्वराज्य पाटील. महिला मॅरेथॉन स्पर्धा - प्रथम - वैभवी कुंभार, द्वितीय - भक्ती मगदूम, तृतीय - अमृता हेळवी, उत्तेजनार्थ - संध्या कागे. हातगाडा स्पर्धा - प्रथम - समरजीत गायकवाड, द्वितीय - नवनाथ पुजारी, तृतीय- अष्टविनायक मंडळ.
या सर्व शर्यती व स्पर्धा पार पाडण्याकरिता सर्व पंच कमिटी, श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा