बोरगांव पीएमश्री मराठी शाळेच्या दिव्याचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथील पी एम श्री सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेची दिव्यांग विद्यार्थिनी कुमारी दिव्या सचिन रत्नाकर हिने चिक्कोडी शैक्षणिक जिल्हातील शाळेच्या दिव्यांगांच्या क्रीडास्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त करून तिची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कुमारी दिव्या सचिन रत्नाकर या पी एम श्री सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, बोरगाव शाळेतील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थिनीने चिक्कोडी शैक्षणिक जिल्हास्तरीय विशेषचे तन प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रीडास्पर्धेत धावणे आणि गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले.
बोरगाव क्लस्टरमधून तिने धवल यश प्राप्त केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुडलगी येथे झालेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत गोळा फेक व पळणे यामध्ये तिने क्रमांक मिळविला आहे.यापुढे ती राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरली आहे.
शाळा सुधारणा समिती व शिक्षक वृंद कडून कुमारी दिव्या हीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत एस बी बेनुरकर यांनी केले. यावेळी अध्यक्ष शिवाजी भोरे म्हणाले, कुमारी दिव्या हिने मिळवलेली यश हे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व सहकार्य व पाठबळ तिला आम्ही देणार असून तिचे अभिनंदन केले. तिच्या या यशात मुख्याध्यापक श्री. आर. एम. पकाले, एस.डी.एम. सी. चे अध्यक्ष श्री. शिवाजी भोरे,तिचे वडील सह शिक्षक सचिन रत्नाकर, आई शिक्षिका देवता रत्नाकर, मराठी शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. डी. टी. हेगडे, यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बोरगाव येथील मराठी शाळेच्या सर्व सदस्य तसेच शाळेतील शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले. कुमारी दिव्या हीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा