शिरोळचे मैदान हरीपूरच्या गजा, कोल्हापूरच्या भुंडा या बैलजोडीने जिंकले

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

    येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त आयोजित केलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीत उदय जगदाळे यांच्या हरिपूरच्या गजा व कोल्हापूरच्या भुंडा या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवत ५१ हजार रोख रक्कम व निशान कायम चषक पारितोषिक पटकाविले. ब गट जनरल बैलगाडी शर्यतीत गट क्रमांक एकमध्ये पप्पू पाटील आणि गट क्रमांक दोनमध्ये यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला. जनरल घोडागाडी शर्यतीत गुरु माळी यांच्या घोडागाडीने हे मैदान मारले.

शिरोळ येथील जनरल अ व ब गट बैलगाडी आणि जनरल घोडागाडी शर्यती पाहण्यासाठी येथील कनवाड रस्त्यावरील मिठारगी येथे लाखो शर्यती शौकिनांनी गर्दी केली होती. शासनाच्या नियमानुसार अटी व शर्तीस अधीन राहून गुरुवारी शिरोळचे मैदान पार पडले. याकरिता शर्यत पंच, उत्सव व उरूस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शर्यती पाहण्यासाठी सकाळपासूनच शर्यतीचे मैदान गर्दीने फुलून गेले होते, अ गट जनरल बैलगाडी शर्यतीसाठी ११ बैलगाड्यांच्या नोंदी झाल्या होत्या. तर ब गट जनरल बैलगाडी शर्यतीसाठी ३२ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या गटातील बैलगाड्यांच्या शर्यती दोन गटात विभागून घेण्यात आल्या. जनरल घोडागाडी शर्यतीसाठी १३ घोडागाडी सहभागी झाल्या होत्या. या सर्व शर्यती उत्साहात आणि लाखो शर्यती शौकिनांच्या उपस्थितीत पार पडल्या. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम निशान व कायम चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.

उमेश माने, प्रशांत जाधव, सागर भाट यांच्या समालोचनामुळे शर्यती शौकिनांमध्ये रोमांच उभा झाले अत्यंत रोमांचक आणि चित्तथरारक शर्यती पार पडल्या. जनरल बैलगाडी शर्यत- प्रथम -उदय जगदाळे ( बोंद्रे सरकारचा गजा आणि महेश पाटील कोल्हापूरचा भुंडा), द्वितीय - प्रसाद उर्फ पप्पू संकपाळ (संदीप पाटील कोल्हापूरचा हरण्या आणि हर्षद बुबनाळे म्हैशाळचा बाशिंग भवरा), तृतीय- पप्पू पाटील (बोंद्रे सरकार हरिपूरचा बुलेट छब्या आणि युवराज शिंदे कोल्हापूरचा सायलेंट वशा). ब गट जनरल बैलगाडी गट क्रमांक एक प्रथम- पप्पू पाटील (बोंद्रे सरकार हरिपूरचा फाकड्या आणि माने रोडलाईन्स अंकले सर्जा) द्वितीय - बंडा कुटकुळे(सोनू पारेकर सलगर आणि घालवाड चिमण्या) तृतीय- स्वप्निल लठ्ठे कुची. ब जनरल बैलगाडी शर्यत गट क्रमांक दोन - प्रथम - सतीश पाटील बिसूर, द्वितीय उदय जगदाळे शिरोळ, तृतीय - सतीशआण्णा बेंद्रे. जनरल घोडागाडी शर्यत - प्रथम - गुरु माळी, द्वितीय - गिरीश कोळी, तृतीय - उदय जगदाळे. या सर्व विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे मार्गदर्शक युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे पंचप्रमुख रावसाहेब देसाई, संभाजीराव जगदाळे, दत्तात्रय सावंत, जयसिंग देसाई, बाळासाहेब गावडे, धनपाल कनवाडे, रामचंद्र पाटील, नायकू गावडे, धनाजी पाटील नरदेकर, रामचंद्र पाटील, संजय चव्हाण, महेश पाटील, अवधूत देसाई, सिताराम शिंदे, सूर्यकांत संकपाळ, अजित चुडमुंगे, दत्तात्रय काळे, दिलीप संकपाळ, प्रतापसिंह पाटील, किरण गावडे, ओंकार गावडे, रविराज जगदाळे, चंद्रकांत भाट, संदीप चुडमुंगे, तुषार पाटील, अर्जुन जाधव, तुषार पाटील, अजय सावंत, विकास शिंदे, संकेत सावंत, दत्तात्रय बाबर, अनिल काळे प्रशांत माने चुडमुंगे, वर्धन रजपूत, डॉ आदेश गावडे, कृष्णा भाट, अमर माने, अनिरुद्ध कोळी आदींनी शर्यती पच म्हणून काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष