मुख्याध्यापक विठ्ठल गुरव यांचे शिक्षण क्षेत्रातील काम दीपस्तंभासारखे : उपशिक्षणाधिकारी एस. के.यादव
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत मुख्याध्यापक विठ्ठल गुरव यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यांच्याकडून असंख्य चांगले विद्यार्थी घडले. त्यांची सर्वांना सहकार्य करायची भावना अतिशय मोलाची आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम दीपस्तंभासारखे आहे ,असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी एस .के. यादव यांनी केले. शिरोली ता. हातकणंगले येथे विद्या मंदिर शिरोली नंबर एकचे मुख्याध्यापक विठ्ठल बळी गुरव यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख कृष्णात पाटील होते तर विस्तार अधिकारी जे टी पाटील हे प्रमुख उपस्थित होते.केंद्र शाळा नागाव व विद्या मंदिर शिरोली नंबर 1 शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विठ्ठल गुरव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र मुख्याध्यापक भीमराव कांबळे, स्वप्नजा गुरव, दत्तात्रय गुरव, विस्तार अधिकारी जे.टी.पाटील साहेब ,केंद्रप्रमुख कृष्णात पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष राजेश जाधव मुख्याध्यापक दीपा देऊडकर ,अंजना संकपाळ ,प्रकाश बेलवलकर ,आशा हातकर ,राधिका पाटील ,जनार्दन कुंभार,बाळासाहेब आळतेकर ,मानिनी कुंभार,स्वाती पाटील,संदीप कोरवी,संजय जाधव,पावलस चौगुले नागाव केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राखी कांबळे यांनी केले. बाळासाहेब आळतेकर यांनी आभार मानले .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा