हेर्ले येथील रत्नागिरी - नागपुर महामार्गाचा अडथळा ; रस्ते दुभाजक व भुयारी मार्ग न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा

 


संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

 रत्नागिरी नागपूर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू असून डोंगर भागाकडे हजारो एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 142/200 या गटामध्ये दुभाजकाची अत्यंत गरज असलने महामार्गावर दुभाजक करुन देण्यात यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. गावाबाहेरच्या उत्तरेस डोंगर भागाकडे रत्नागिरी नागपूर या नवीन महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शासनाने हा रस्ता पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा गतिमान केली आहे.शासनाने या महामार्गात येणाऱ्या शेतजमिनींचे भूसंपादन करून रस्त्याचे काम सुरू ठेवले आहे.

     रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाच्या टप्प्यात 49 गावातून हा रस्ता जात आहे. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील 6 गावांचा समावेश आहे. यामध्ये नागाव, टोप ,वडगाव,हेर्ले' माले ,चोकाक ही गावे समाविष्ट आहेत.  गावच्या उत्तर दिशेला डोंगर भाग आहे. या ठिकाणी पंचगंगा नदीतून पाईपलाईन नेऊन उसाची समृद्ध शेती शेतकऱ्यांनी केली आहे. या डोंगर भागाकडे ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे .काही दिवसा मध्ये ऊस कारखाने सुरू होवून ऊस वाहतूक सुरू होणार आहे.यामुळे या ठिकाणी महामार्गावर दुभाजकाची अत्यंत आवश्यकता आहे.अन्यथा ऊस वाहतूक मौजे वडगाव येथून करावी लागणार आहे.गावातील शेतकऱ्यांनी भुयारी मार्ग व दुभाजक करण्यासाठी रस्ते महामंडळाकडे सहा महिन्यापूर्वी अर्ज करून देखील याची दखल घेण्यात आलेली नाही याबद्दल शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .काही दिवसापूर्वी खासदार धैर्यशील माने यांनी या ठिकाणी भुयारी मार्ग करावा यासाठी रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते .तरीही भुयारी मार्ग व दुभाजक झालेला नाही .या ठिकाणी तातडीने दुभाजक शासनाने करुन द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी जलू सूर्यवंशी यांनी सांगितले की :शासनाने शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेऊन या ठिकाणी महामार्गावर तातडीने दुभाजक करावा. उद्योगपती सरदार आवळे सांगितले की 

परिसरात गावातील शेतकऱ्यांची हजारो एकर शेती असून बहुतांशी क्षेत्रात उसाची शेती आहे. जनावरांना ,वाहनांना व ऊस वाहतूक करताना या महामार्गावरून रस्ता ओलांडणे अतिशय धोक्याचे असून शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून तातडीने दुभाजक तयार करून द्यावा.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष