जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत गुरुकुलच्या मुलांची बाजी

 



    कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

      क्रीडा व युवक सेवा संचानालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर यांच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेमध्ये गुरुकुल शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

        कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या 17 वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच 19 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला.

       त्याचबरोबर गुरुकुल विद्यालयातील 17 वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला व 17 वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकविला. तसेच 19 वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकविला.

        यातील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सततचा सराव, जिद्द, भरपूर आत्मविश्वास यामुळेच त्यांना हे यश प्राप्त करता आले.

       या सर्वच विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांचे प्रशिक्षक श्री. सुनील चव्हाण, अमित बरगाले सर, तसेच संस्थेचे चेअरमन गणेश नायकुडे सर संस्थेच्या व्हा.चेअरमन नविता नायकुडे मॅडम, तसेच दोन्ही प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. बालिका पाटील व सौ. रेवती मगदूम मॅडम उपमुख्याध्यापिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वच विद्यार्थ्यांवर पालकांकडून व गुरुकुल परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष