सन्मति विद्यालयामध्ये संविधान दिन संपन्न
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ येथे संविधान दिन उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक पी बी शेट्टी हे होते. यावेळी वक्ते ए.एस चोपडे ,आर सी.चौगुले ,ए.पी चौगुले ,आर सी चौगुले, ज्येष्ठ अध्यापक व्ही एम खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आर.सी चौगुले यांनी स्वागत व प्रस्तावित केले . यावेळी संविधानाविषयी प्रथमेश सुतार ,भूमिका खोबरे ,सई मोरे , अन्वी कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
वक्ते श्री चोपडे म्हणाले ,"गरीब व श्रीमंतांना समानतेने जगण्याची प्रेरणा देणारा एक ग्रंथ म्हणजे 'संविधान' होय .संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्यामुळे आपल्या देशाचा घटनात्मक विकास खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. संविधानातील कलमांचे आपण सर्वांनी पालन केल्यास लोकशाही बळकटीला हातभार लागेल".
अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक श्री शेट्टी म्हणाले ",देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार हे मूळ घटनासमिती वेळी सदस्य होते .त्यांची देखील त्यावर स्वाक्षरी आहे.संविधानाश व त्यातील नियमावलीचा अवलंब करून परिशिष्टाततील तरतूदींचा सन्मान प्रत्येकाने करावा."एस.बी मसुटे यांनी आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा