जयसिंगपुरात संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्यावतीने रविवार दि. १ डिसेंबर रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महासंघाचे शिरोळ तालुकाध्यक्ष सुरेश पुकाळे यांनी दिली आहे.

  राष्ट्रीय व राज्य पातळीवर नामदेव, शिंपी समाजाचे कार्य कसे चालते, केंद्र व राज्य शासनाच्या शासकिय योजनांची माहिती मिळावी, नामदेव, शिंपी समाजाची एकजुठ व्हावी, समाजाचा स्नेहभाव वाढून सर्वांचा परिचय व्हावा याकरीता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात होणार आहे. यानंतर दिंडी व पालखी सोहळा होणार आहे. तुलशी ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मिरज येथील सौ. पूजा कपील कोपार्डे यांचे नारदीय किर्तन होणार आहे. त्यानंतर विवेका सुरेश पुकाळे, अनुष्का राजेंद्र भस्मे यांच्या कथक नृत्यातील गणेश वंदना होणार आहे. यानंतर अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. जयंती उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

  या जयंती सोहळ्यास नामदेव क्षत्रिय महासंघाचे अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर, सचिव महादेव खटावकर, भक्ती संप्रदाय संघ पुणेचे अध्यक्ष रामकृष्ण बागडे महाराज, डॉ. अभिमन्यू खटावकर, महेश काकडे, पांडूरंग दाभोळे, भारत कोळेकर, बाळासाहेब आंबेकर, प्रदीप कळसकर, जगदिश प्रसाद नामदेव, रमेश भिंगे, अश्विनी वायचळ, नंदकुमार कोसबतवार, सुनिल होमकर, संतोष मुळे, भिकाजी गाणबावले यांच्यासह समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष