गौरवाडला उच्चांकी ८४ टक्के मतदान

 


अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ विधानसभेसाठी गौरवाड मध्ये उच्चांकी ८४ टक्के मतदान झाले. दिवसभर मतदानासाठी तुरळक गर्दी होती.तरीही चार वाजल्यानतंर मतदान केंद्र क्रमांक २४७ वर मतदारांची जास्त गर्दी झाली.यामुळे मतदान प्रक्रिया सात वाजेपर्यंत सुरु राहीली.

  गौरवाडमध्ये एकुण २५५५ मतदार आहेत.यापैकी २१४४ मतदारानी आपल्या बहुमोल मताचा हक्क बजावला. यातील मतदान केंद्र क्रमांक २४६ मध्ये एकुण १२७५ मतदारापैकी १०३५ मतदान झाले.यात ५३० पुरुष व ५०५ स्त्री मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्र क्रमांक २४७ मध्ये एकुण १२८८ मतदारापैकी ११०९ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये ५६१ पुरुष व ५४७ स्त्री मतदारांनी हक्क बजावला. सरासरी मतदान ८४ टक्के उच्चांकी मतदान झाले. मविआ,स्वाभिमानी शेतकरी संघटना,राजर्षी शाहु विकास आघाडी,महायुतीच्या कार्यकर्त्यानी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष