हजरत नूरखान बादशाह की दोस्तारो धिनच्या गजरात मानाचा गलिफ अर्पण
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
हजरत नूरखान बादशाह की दोस्तारो धिनच्या गजरात श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस समिती, व शिरोळ नगरपरिषद यांच्यावतीने हजरत नूरखान बादशाह समाधी स्थळास मानाचा गलिफ मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त उद्योग समूहाचे नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरुवारी सायंकाळी शिरोळ नगरपरिषद येथून हजरत नूरखान बादशाह समाधी स्थळास अर्पण करण्यात येणाऱ्या मानाच्या गलिफाची मिरवणूक काढण्यात आली. बँन्ड आणि पारंपारिक वाद्याचा गजरात, आणि शोभेच्या दारूची आकर्षक आतिषबाजी करीत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजरत नूरखान बादशाह की दोस्तारो धिनचा अखंड जयघोष करीत विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिरोळचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकारमहर्षी गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, शिरोळ पालिकेचे प्रशासक निशिकांत परचंडराव, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, युवा सेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, पत्रकार आप्पालाल चिकोडे, डॉ. दगडू माने, चंद्रकांत भाट, बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख, श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने, माजी नगरसेवक पंडीत काळे, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे, फत्तेलाल मेस्त्री, परवेज मेस्त्री, शिरोळभूषण दिलीपराव माने, जब्बार मेस्त्री, संतोष उर्फ छोटू पूंदे (SP), इम्रान अत्तार प्रदिप चव्हाण विराजसिंह यादव, अजित चिक्कोडे, अमर शिंदे,प्रविण जिरगे, महेश पाटील, मानसिंग पाटील, उदय संकपाळ - शिलेदार, अबिद गवंडी, आयुब मेस्त्री, दिपक शिंदे,वैभव काळे,अमित उर्फ बंटी संकपाळ,स्वप्निल ढेरे- देसाई,सुमित देसाई,नासरभाई पठाण,आण्णसो पुजारी, सुरज कांबळे, प्रतिक धर्माधिकारी,धैर्यशील देसाई, दयानंद जाधव, खंडेराव हेरवाडे, मारुती पुजारी (गोंधळी), रसुल मोमीन, अनिल माने (सर्पमित्र), संतोष पुंदे, दिपक भाट, अमर खलिफ, इस्माईल मत्ते, रशिद मत्ते, सुमित इंगळे, देवाप्पा पुजारी, राजू कोळी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे अवधूत उर्फ बाबाजी पाटील, लालासो गावडे, अनिल काळे, मोहन यादव, प्रफुल कोळी संदीप गावडे, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत हजरत नूरखान बादशाह समाधी स्थळावर मानाचा गलिफ अर्पण करण्यात आला. यावेळी हजरत नूरखान बादशाह की दोस्तारो धिनचा अखंड जयघोष सुरू होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा