अकलूजच्या पै. संतोष जगतापने पै संदीप मोटेस दाखविले आस्मान
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै संतोष जगताप यांच्यात रंगतदार कुस्ती होऊन पै संतोष जगताप यांने पै संदीप मोटे यास घुटना डावावर आस्मान दाखविले. या कुस्ती मैदानात सुमारे १५० हून अधिक चटकदार व रंगतदार कुस्त्या उत्साहात पार पडल्या.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीच्या वतीने येथील कै. माजी आमदार दिनबंधू दिनकररावजी यादव कुस्ती आखाडा येथे कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. कुस्ती मैदानाचे पूजन पै. आण्णासो पुजारी यांच्या हस्ते झाले. श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, युवानेते पृथ्वीराज सिंह यादव पै शंकरराव पुजारी कोथळीकर, संजीव पुजारी, माजी नगरसेवक दयानंद जाधव, उद्योगपती रणजीत शिंदे, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख, रामदास गावडे, सचिन पाटील कणंगलेकर, पै बाबासाहेब खोद्रें, अमोल खंबाळे, अजित शिंदे, बाबाराजे महाडिक, पत्रकार डी आर पाटील, उल्हास उत्तमराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या कुस्ती मैदानात पहिला क्रमांकाची कुस्ती सांगली येथील भोसले व्यायाम शाळेचा मल्ल उपमहाराष्ट्र केसरी पै. संदीप मोटे विरुद्ध अकलूज येथील शिवनेरी तालीमचा मल्ल महाराष्ट्र चॅम्पियन पै संतोष जगताप यांच्यात अत्यंत रंगतदार व चुरशीने कुस्ती झाली. दोन्ही मल्ल ताकदीचे असल्याने दोघांनीही शक्ती व युक्तीचा वापर करत ही कुस्ती रंगतदार केली सुमारे दहा मिनिटे सुरू असलेली कुस्ती पै संग्राम जगतापने घुटना डावावर पै संदीप मोटेस आस्मान दाखविले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पवार तालीम सांगलीचा मल्ल पै. बाळू अपराध विरुद्ध नगरचा मल्ल पै. लक्ष्मण जाधव यांच्यात झाली ही कुस्ती सुमारे १६ मिनिटे सुरू होती पै बाळू अपराध याने गदालोट डावावर पै लक्ष्मण जाधव याच्यावर विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूर शाहूपुरी तालीमचा पै. चैतन्य टिकोळे विरुद्ध खंडेराजुरीचा पै. विश्वजीत रुपनर यांच्यात झाली. ही कुस्ती सुमारे बारा मिनिटे सुरू होती पै. विश्वजीत रुपनर यांने एकचाकी डावावर पै. चैतन्य टिकोळे यास मैदान दाखविले. शिरोळच्या या कुस्ती मैदानात मोठा गट४० मध्यम गट ४५ तर लहान गटात ७० अशा एकूण १५५ कुस्त्या पार पडल्या. कुस्त्यांची लढत लावण्यासाठी शिरोळ तालुका कुस्तीगीर परिषदेचे पै प्रकाश गावडे पै.मज्जिद आत्तार यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वच कुस्त्या अटीतटीच्या रोमांचक आणि रंगतदार झाल्या. कुस्ती निवेदक जोतिराम वाझे व पै नंदू सुतार यांच्या कुस्तीचा इतिहास सांगणाऱ्या उत्कृष्ट समालोचनामुळे उपस्थित कुस्ती शौकिकांनामध्येही उत्साह संचारला. हलगीचा कडकडाट, आणि तुतारीच्या गर्जनेत या कुस्ती मैदानातील प्रत्येक पैलवानांना कुस्तीच्या लढतीची ऊर्जा मिळत होती. यामुळे हे कुस्ती मैदान रंगतदार झाले.
पै.रावसाहेब देसाई, गुरुनाथ भुशिंगे, अरुण गावडे, सौरभ कोळी, शिवाजी मरळे, दत्तात्रय माने, देवाप्पा पुजारी, आयुब मेस्त्री, राजू आरगे, रायगोंडा पाटील, इमाम पटेल, पी आर पाटील, गणीसो आत्तार, संजय देबाजे, नन्नू शेख, सुभाष माळी, राजू कुंभार, श्रीहरी वाघमारे, नवनाथ कुंभार, अमित पाटील, अशोक चौगुले, पृथ्वीराज देसाई, विक्रम मोरे, सचिन पाटील, स्वप्निल पाटील, राजेंद्र खटावकर, निळकंठ गावडे सतीश माने यांनी पंच म्हणून काम पाहिले.
यावेळी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे, राहुल यादव, अनिल काळे, मोहन यादव, चंद्रकांत भाट, अवधूत उर्फ बाबाजी पाटील, दीपक भाट, दत्तात्रय बाबर, सुभाष भाट, धनाजी गावडे, उत्तम भाट, लालासो गावडे, संदीप गावडे, सागर काळे, दरगू गावडे, अक्षय भाट, साहिल भाट, पारस भाट, प्रसाद यादव, संकेत बाबर, नवनाथ भाट, सागर भाट, सागर काळे, ऋषिकेश कदम, तानाजी काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा